मोहाली स्टेडिअमची पाहणी न करताच डिकासन आबुधाबीला

December 4, 2008 2:42 PM0 commentsViews: 6

3 डिसेंबर, मोहाली इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा विषयक तज्ज्ञ रेज डिकासन आज मोहालीतल्या स्टेडिअमची पाहणी न करताच आबुधाबीला निघून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. इंग्लंडची टीम आज आबुधाबीला पोहोचणार आहे आणि टीमला चेन्नईतील सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यासाठी डिकासन आबुधाबीला गेल्याचं बोललं जातंय. दुसरी टेस्ट मोहालीला होणार की नाही हे निश्चित नाही. डिकासन येत्या शनिवारी भारतात परतण्याची शक्यता आहे. त्यानंतरच ते मोहाली टेस्टविषयी निर्णय घेण्यात येईल. आधी ठरल्याप्रमाणे डिकासन आज मोहालीतल्या स्टेडिअमची पाहणी करणार होते आणि आजच त्याबाबतचा अहवाल इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सादर करणार होते. चेन्नईतल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी कालच त्यांनी समाधान व्यक्त केलंय.

close