भारताचे पाकला 193 धावांचे आव्हान

December 28, 2012 1:10 PM0 commentsViews: 34

28 डिसेंबर

पाकिस्तानविरुद्धची पहिली टी 20 मॅच गमावल्यानंतर आज अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी आणि शेवटची टी 20 मॅच रंगतेय. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीची संधी दिली. भारताने निर्धारीत 20 ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग करत 5 विकेट गमावत 192 धावा केल्या असून पाकला 193 धावांचे आव्हान दिले आहे. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे या ओपनिंग जोडीने धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 21 रन्सवर गौतम गंभीरला उमर गुलने एलबीडब्ल्यु आऊट केलं. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेची कॅच घेऊन गुलने रहाणेला तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने टीम इंडियाची बाजू सावरली. युवराजने धडाकेबाज बॅटिंग करत 36 बॉलमध्ये 72 रन्स केले यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. युवराजच्या या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाला 192 धावांवर मजल मारता आली. युवराजने एकीकडे टीम इंडियाची बाजू भक्कम केली तर विराट कोहली 27 रन्स तर महेंद्र सिंग धोणी 33 रन्सवर आऊट झाले.

close