मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेतच, महिला आयोग अध्यक्षांपासून वंचितच

January 8, 2013 1:44 PM0 commentsViews: 50

08 जानेवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानंतरही अजूनही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. प्रदेश काँग्रेसच्यावतीनं मुख्यमंत्र्यांकडे 3 उमेदवारांची नाव देण्यात आलेली आहेत. पण त्या संदर्भात हालचाल झालेली नाही. आयबीएन-लोकमतशी बोलताना लवकरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांच्या नेमणुका करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनीही 2 ते 3 दिवसांत नियुक्ती करू असं आश्वासन दिलं होतं. पण काँग्रेसच्या नेत्यांकडून फक्त आश्वासन देण्यात येतायत.पण नियुक्तीबाबत कुठलीही ठोस पावलं उचलण्यात येत नाहीत.

close