जैतापूर प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचं जेलभरो आंदोलन

January 2, 2013 2:24 PM0 commentsViews: 6

02 जानेवारी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येने साखरी नाटे इथले मच्छीमार आणि प्रकल्पग्रस्तांनी जेलभरो आंदोलन केलं. अणु उर्जा प्रकल्प उभारणार्‍या अरेवा या कंपनीचा लवकरच एनपीसीआयएलशी प्राथमिक करार होणार आहे. याचा निषेध करत प्रकल्पाच्या विरोधात साखरी नाटेतल्या सुमारे 3 हजार लोकांनी मच्छीमारांसह शांततेत जेलभरो आंदोलन केलं. माडबन मधल्या प्रकल्पग्रस्तही या आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच शिवसेना, आरपीआय आणि सीपीआयचे कार्यकर्तेही या आंदोलनात उतरले. आंदोलकांना प्रकल्पस्थळी जाण्यास मज्जाव केलेला असल्यामुळे साखरी नाटेतून निघालेल्या या आंदोलकांनी सहाकिलोमीटर पायी चालत जाऊन स्वत:ला अटक करून घेतली.

close