प्रेयसीवर बलात्कार करून प्रियकराने केला खून

December 28, 2012 2:10 PM0 commentsViews: 43

28 डिसेंबर

ठाणे जिल्ह्यातील वसईतील वालीव भागात 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडलीय. मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्याच प्रियकराने बलात्कार करून खून केल्याचं पोलीस तपासातून निष्पण झालंय. पंकज कुमार असं या आरोपीच नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पंकजच्या मावशीच्या घरी मृत मुलगी आली असता तिला लग्नाची मागणी केली. मुलीने लग्नाला नकार दिल्याने पंकजने तिच्यावर बलात्कार करुन गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आधी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मुलीच्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. पोस्टमॉर्टमच्या अहवालात बलात्कार आणि गळा दाबून खून केल्याच उघड झाल्यानंतर वालीव पोलिसांनी पंकजला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

close