छेडछाडीमुळे तरूणीची आत्महत्या

January 1, 2013 9:38 AM0 commentsViews: 3

01 जानेवारी 2013

नव्या वर्षाच्या सुरवातीलाही महिलांवरच्या अत्याचार सुरुच आहेत. अकोल्यामध्ये छेडछाडीला कंटाळून एका 20 वर्षांच्या तरुणीनं आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या प्रकरणी चंद्रकांत बोरकर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून हा मुलगा, या तरुणीची छेड काढत होता असा आरोप करण्यात येतोय. या छेडछाडीला कंटाळून या तरुणीनं आज तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली.

ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

तर ठाण्यात एकतर्फी प्रेमातून ठाणे रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झालाय. लग्नाला नकार देणार्‍या या तरुणीवर त्या माथेफिरु तरुणानं ब्लेडनं वार केलेत आणि नंतर स्वत:ही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या दोघांनाही पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलंय. हा सगळा प्रकार ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये घडला. मात्र हा धक्कादायक प्रकार घडत असताना उपस्थितांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मुंबईत महिलेची छेडछाड

तर राज्याच्या राजधानी मुंबई थर्टी फस्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या महिलेची छेडछाड केल्याची घटना घडलीय. सांताक्रुझ इथं ही घटना घडली. सदरीलमहिला आपल्या पतीसोबत असताना एका टोळक्यानं छेडछाड केली. पण तेथे उपस्थिती असलेल्या जमावाने टोळ्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

close