मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा देण्याचा इशारा

January 8, 2013 1:54 PM0 commentsViews: 39

08 जानेवारी

मराठवाड्यात एकमेव मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 'इंजिन'पासून आपला 'डब्बा' वेगळा करण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतलाय. पक्षामध्ये आपली घुसमट होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. या आधीही दोनदा त्यांचं राजीनामानाट्य रंगलं होतं. याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. मात्र अजून तरी जाधव यांच्या भूमिकेवर पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव प्रकाशझोतात आले होते. मागिल निवडणुकीत कन्नड तालुक्यातून मनसेच्या तिकीटावर मराठवाड्यात एकमेव निवडून येण्याचा पराक्रम हर्षवर्धन जाधव यांनी करून दाखवला होता.

close