राष्ट्रवादीला झटका, संदेश पारकर काँग्रेसमध्ये

January 2, 2013 2:29 PM0 commentsViews: 14

02 जानेवारी

सिंधुदुर्गचे राष्ट्रवादीचे नेते संदेश पारकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकेकाळचे नारायण राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे संदेश पारकर यांना काँग्रेसमध्ये आणून राणेंनी सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला खिंडार पाडलंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि नारायण राणेंच्या उपस्थितीत संदेश पारकर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक महिन्यांपासून पारकर राष्ट्रवादीत नाराज होते. ते इतर पक्षाच्या वाटेवर आहेत अशा बातम्या येत होत्या. पण आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलीकडच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाक्‌युद्धाच्या पार्श्वभूमीवर संदेश पारकरांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय.

close