‘बलात्काराच्या घटना ‘इंडिया’त जास्त,भारतात कमी’

January 4, 2013 9:20 AM0 commentsViews: 6

04 जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागात बलात्कारांचं प्रमाण अधिक आहे, आणि याला शहरांमधील पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. अशा घटना भारतात कमी घडतात पण इंडियामध्ये अशा घटना वारंवार घडत असतात असं वक्तव्य त्यांनी केलंय. मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत आरएसएसने सारावासारव केली. भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं स्पष्टीकरण आरएसएसचे प्रवक्ते राम माधव यांनी दिलंय. मात्र भागवत यांच्या व्यक्तव्यामुळे विविध क्षेत्रातून भागवत यांच्या वक्तव्यावर टीका होऊ लागली आहे.

close