पुण्यात ’31 डिसेंबर’ला रात्री एकच्या पुढे पार्टी नको :शिवसेना

December 26, 2012 4:11 PM0 commentsViews: 11

26 डिसेंबर

नव्यावर्षात पदार्पण करण्यासाठी काही दिवसच उरले आहे. तर पुण्यात 31 डिसेंबरच्या रात्री पब आणि हॉटेल्समध्ये होणार्‍या पाटर्‌याना रात्री एक वाजेपर्यंत जास्त परवानगी देऊ नये आणि 18 वर्षाखालील मुलांना पार्टीत मादक द्रव्य देऊ नये जर अशा हॉटेल्स आणि पब नियमाचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी केलीय. तसंच शिवसेना पुण्यातील पाटर्‌यावर देखरेख ठेवण्याकरता पथक तयार करणार असल्याची माहिती नीलम गोर्‍हे यांनी दिलीय. थर्टीफस्टच्या रात्री होणार्‍या पब आणि हॉटेल्स मध्ये होणार्‍या पाटर्‌यात नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे या मागणीकरिता नीलम गोर्‍हे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना भेटून निवेदन दिलंय.

close