राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

January 1, 2013 9:50 AM0 commentsViews: 9

01 जानेवारी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनीताई पाटील यांना उमेदवारी दिली आहे. रजनीताई सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात. त्या उद्या काँग्रेसच्या वतीने राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील. या जागेसाठी शिवराज पाटील चाकुरकर, रोहिदास पाटील, अनिस अहमद आदी जण स्पर्धेत होते. पण मराठवाड्याची जागा मराठवाड्याकडं आणि महिलेला देण्याचा निर्णय सोनिया गांधींना दिला.

close