गिरणी कामगारांची कोहिनूर मिलवर धडक

January 7, 2013 9:20 AM0 commentsViews: 42

07 जानेवारी

विविध मागण्यांसाठी गिरणी कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलन करत दादर पूर्वेच्या कोहिनूर मिलवर धडक दिली. गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी दादर इथल्या कोहिनूर मिलवर धडक दिलीय. 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार दादरच्या कोहिनूर मिलमध्ये धडकले. कामगारांनी मिलचा ताबा घेतला. दोन तासांच्या या आंदोलनांनंतर एटीसीच्या अधिकार्‍यांनी सात दिवसात कोहिनूर मिलच्या जागावाटपासंदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर कामगारांनी मिलचा ताबा सोडला. पण 15 जानेवारीपर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा गिरणी कामगारांनी इशारा दिलाय.

close