‘आधारकार्ड’धारक 9 बांगलादेशींना अटक

January 10, 2013 5:21 PM0 commentsViews: 8

10 जानेवारी

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकारार्‍यांनी कर्नाक बंदर येथून 9 बंागलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये पाच पुरूष तर 4 महिला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड आदी महत्वाचे कागदपत्र सापडली आहेत. हे पुरावे त्यांंनी केवळ 2500 हजार रुपयांना बनवल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. आजपर्यंत बांगलादेशीना अटक झाल्याच्या घटना घडल्या आहेत पण यावेळी या नागरीकांकडे देशात नव्याने सुरू झालेल्या आधार कार्ड योजनेत त्यांच्या नावाने कार्ड प्राप्त झाल्याचं समोर आलंय. ही बाब अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक आहे अशी चिंता पोलीस उपायुक्त संजय शिंत्रे यांनी केली.

close