एकनाथ खडसे विमान अपघातातून बालबाल बचावले

December 28, 2012 4:31 PM0 commentsViews: 73

28 डिसेंबर

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि पुणे भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी विमान अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. खडसे आणि मठकरी प्रवास करत असलेल्या विमानाला 18 हजार फूट उंचीवर अचानक आग लागली. पण सुदैवाने विमान पुण्यातील विमानतळावर सुरक्षीत उतरवण्यात आलं. एकनाथ खडसे आणि विकास मठकरी जळगावहून एका खासगी पाच सीटर विमनाने पुण्याला निघाले होते. पुण्यापासून काही अंतरावर दूर असताना अचानक या विमानाच्या कॉकपिटमधून धूर निघू लागला. वैमानिकांने प्रसंगावधान राहून तातडीने विमान धावपट्टीवर उतरवल्यामुळे मोठी हानी टळली.

close