मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेबाबत अखेर सरकारला आली जाग

December 26, 2012 4:43 PM0 commentsViews: 11

26 डिसेंबर

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाढत जाणारे अपघात लक्षात घेऊन आज रस्ते विकास महामंडळाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यात सुरक्षेसाठी विविध उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात 'एक्स्प्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, घाटातील धोकादायक वळणं कमी करणे, डिव्हायडरवरच्या झाडांची उंची दीड मीटर राखणे असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

close