दुष्काळाचा दुसरा बळी ; विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

January 4, 2013 10:11 AM0 commentsViews: 5

04 जानेवारी

मराठवाड्यासह राज्यातील काही भागात दुष्काळाचे जोरदार चटके बसत आहे. या दुष्काळानं आज दुसरा बळी घेतलाय. परभणी जिल्ह्यातील आर्वी गावात एकनाथ कदम या युवकाचा विहिरीतून पाणी काढताना मृत्यू झालाय. या आधी दोनच दिवसांपूर्वी लाडसावंगी या गावात एका 13 वर्षांच्या मुलाचा पाण्यासाठी टँकरमागे धावताना टँकरखाली येऊन मृत्यू झाला होता. आर्वी गावात सार्वजनिक जुनी विहीर (बारह) आहे. या विहिरीत पाणीसाठी तळाला लागला असून पाण्यात मोठ्याप्रमाणावर गाळ जमा झालाय. मात्र पाण्यात परिस्थिती बिकट असल्यामुळे गावकर्‍यांना या विहिरीतून पाणी भरावे लागते. गुरूवारी साडेचार वाजता एकनाथ कदम नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरत असताना एकनाथचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दोन मित्रानी विहिरीत उडी टाकली मात्र गाळात फसल्यामुळे एकनाथला वाचवता आले नाही. दुर्देवाची गोष्ट म्हणजे ज्याविहिरीत एकनाथ कदम आणि गावकरी पाणी भरण्यासाठी येतात त्या विहिरीतल पाणी दुषित झालं असून जनावरांनाही पिण्याच्या लायकीच नसल्याचं गावकर्‍यांचं म्हणणंय. एकनाथच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरलीय. आता तरी सरकारने जागं व्हावं अशी मागणी गावकरी करत आहे.

close