कोकणात शिवसेनेला धक्का;परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर

January 7, 2013 9:22 AM0 commentsViews: 53

07 जानेवारी

शिवसेनेचे कोकणातील नाराज नेते परशुराम उपरकर मनसेमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आधीच सिंधुदुर्गात कमजोर असलेल्या शिवसेनेला आणखी मोठं खिंडार पडणार आहे. उपरकर यांच्या सोबत सावंतवाडी, दोडामार्ग ,देवगड ,मालवण मधले शिवसैनिकही मनसेमध्ये दाखल होणार आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी परशुराम उपरकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली असून स्वत: उपरकर यांनी या भेटीबाबत दुजारा दिलाय.

close