बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्‍या 21 सुरक्षारक्षकांना अटक

January 10, 2013 3:57 PM0 commentsViews: 9

10 जानेवारी

मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकार्‍यांनी कारवाई करून 21 सुरक्षारक्षकांना वांद्रे भागातून अटक केली आहेत. त्यांच्याकडून 21 रायफली जप्त केल्या आहेत. क्राईम ब्राँचच्या प्रॉपर्टी सेलच्या अधिकार्‍यांना काही व्यक्ती बेकायदेशीर रायफलीचा वापर करून सुरक्षा पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या 21 पैकी 15 रायफली डबल बॅरेलच्या आहेत. तर 6 रायफली सिंगल बॅरेलच्या आहेत. या सुरक्षारक्षकांकडून 193 जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 30 नुसार कारवाई करण्यात आलीय.

close