‘रतन’ टाटा निवृत्त, सायरस मिस्त्रींकडे धुरा

December 28, 2012 5:31 PM0 commentsViews: 22

28 डिसेंबर

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा आज निवृत्त झाले. आज त्यांचा 75 वा वाढदिवस आहे आणि याच दिवशी त्यांनी सगळी सूत्र 44 वर्षांच्या सायरस मिस्त्री यांच्याकडे सुपूर्द केलीय. सायरस मिस्त्री हे 100 अब्ज डॉलरचा हा डोलारा समर्थपणे सांभाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. गेली दोन दशकं टाटा समुहाचं नेतृत्व करणं हा आपला गौरव होता, असं भावनिक पत्र त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना लिहलंय. टाटानं गेल्या काही वर्षांत जगभरातल्या अनेक कंपन्या खरेदी केल्या. पण हे करताना भान राखा आणि मार्जीन सांभाळण्यासाठी कठोर मेहनत करा, असा सल्ला त्यांनी दिलाय. स्वत:चा ठसा उमटवण्याचं कठीण आव्हान समूहाच्या कंपन्यांसमोर आहे, असं सांगत त्यांनी वास्तवाचं भानही करून दिलंय. पण हा कठीण काळ संपेल असा आशावादही त्यांनी व्यक्त ेकलाय.

close