पाण्यासाठी टँकरमागे धावणार्‍या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

January 1, 2013 10:12 AM0 commentsViews: 3

01 जानेवारी

मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्यात. मराठवाड्यात दुष्काळाचा पहिला बळी गेलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात पाण्यासाठी 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. पाणी आणण्यासाठी टँकरमागे धावताना ही दुर्देवी घटना घडलीय. लाडसावंगीत मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. टँकर आल्यानंतर घोटभर पाण्यासाठी गावकरी जीव धोक्यात घालून धडपडत असतात. याच पाण्यासाठी आता एकाला आपला जीव गमवावा लागलाय.

close