धुळ्यात जनजीवन पूर्वपदावर

January 7, 2013 9:35 AM0 commentsViews: 5

07 जानेवारी

धुळे शहरातील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता आहे. जनजीवन आता पूर्वपदावर आलंय. रविवारी दोन गटात हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादानंतर दंगलीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर 106 पोलिसांसह 164 जण जखमी झालेत. शहरातला मच्छीबाजार आणि माधवपुरा भागात ही घटना घडली. धुळ्याचे पालकमंत्री सुरेश शेट्टी यांनी आज धुळ्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासन, पोलीस अधिकारी, आणि सर्वधर्मीय नेत्यांची बैठक घेतली. आणि त्यानंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. धुळे शहरात रॅपिड ऍक्शन फोर्स आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शहरातल्या मच्छीबाजार आणि माधवपुरा भागात अजूनही संचारबंदी आहे. पण शहरातली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता आहे. जनजीवन आता पूर्वपदावर आलंय. दरम्यान या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, शांतता राखावी असं आवाहन धुळ्याचे एसपी प्रदीप देशपांडे आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलंय.

close