गहुंजे स्टेडियमवरील सुब्रतो रॉय यांचे नाव झाकले

January 8, 2013 3:42 PM0 commentsViews: 7

08 जानेवारी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा ग्रुपमधील वाद चिघळलाय. पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमवरील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम हे नाव आता काळ्या कपड्याने झाकण्यात आले आहे. सहारा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटेनेतील सामंज्यस्य करार झाला होता. त्यानुसार स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचं नाव देण्याच्या बदल्यात सहारा 207 कोटी संघटनेला देणार होती. या पैशावरुन वाद सुरू झाल्याचं सुत्राचं म्हणणं आहे. तर सहारा समुहाकडून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आलाय. डागडूजीसाठी हा पडदा लावण्यात आलाय असं त्यांनी म्हटलंय.

close