सिंचन घोटाळ्याची फौजदारी चौकशी करावी : मनसे

December 28, 2012 5:44 PM0 commentsViews: 5

28 डिसेंबर

सत्ताधारी आणि भाजपमध्ये साटंलोटं आहे त्यामुळे सिंचनाच्या घोटाळ्याची फौजदारी चौकशी व्हावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळानं राज्यापाल के शंकरनारायन यांच्याकडे केलीये. त्याचबरोबर सिंचनाच्या कंत्राट प्रक्रियाचीसुद्‌धा फौजदारी चौकशी व्हावी अशी मागणी मनसेने केलीय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एसआयटी चौकशीची मागणी करण्याच्या पूर्वसंध्येला भाजपचे खासदार अजय संचेती यांच्या घरी सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक झाली त्यामुळे एसआयटीवर आमचा विश्वास नाही असा आरोप मनसेने केलाय. या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती पाहता 31 डिसेंबरला एसआयटीची कार्यकक्षा निश्चित करताना फौजदारी चौकशीचा अंतर्भाव करावा अशी मागणी मनसेनं राज्यपालांकडे मागणी केलीय.

close