देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा

December 4, 2008 4:50 PM0 commentsViews: 5

4 डिसेंबर, दिल्ली देशभरातील विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लहान विमानतळांना धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून आल्यानंतर सर्व विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली. पासपोर्टची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसंच दिल्ली विमानतळावर एनएसजीची टीमही सज्ज ठेवण्यात आली आहे. विमान अपहरणासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी एनएसजीला ला सज्ज राहायला सांगण्यात आलंय तसंच बॉर्डर आणि समुद्रकिनार्‍यालगतच्या विमानतळाच्या सुरक्षेसाठी फायटर प्लेन्सही तयार ठेवण्यात आलेत. मुंबई, दिल्ली, जयपूर, चंदीगड, चेन्नई आणि गुवाहाटी इथल्या विमानतळांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय.

close