दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला बलात्कार

January 8, 2013 4:25 PM0 commentsViews: 22

08 जानेवारी

दिल्लीत सामूहिक बलात्कार घटना ताजी असतानाच ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. जुन्नरमधल्या नारायणगाव इथल्या ग्रामोन्नती मंडळाच्या हायस्कूलमध्ये शिक्षक असलेला दीपकराज शास्त्री यानं 6 महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेल्या 10 वर्षांच्या मुलीवर मागच्या काही महिन्यांपासून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या शिक्षकांने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबात स्थानिक महिलांना संशय आल्यावरून पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. आज दुपारी या नराधामाला पोलिसांनी ताब्यात घेतल असून गुन्हा दाखल केला.

close