संमेलनावर पुन्हा वादाचा ‘परशू’

January 12, 2013 5:12 PM0 commentsViews: 7

12 जानेवारी

चिपळूण साहित्य संमेलनातील वाद काही संपता संपेना असंच दिसतंय. कारण निमंत्रण पत्रिकेत परशुरामाचा फोटो छापल्यामुळे संभाजी बिग्रेडने संमलेन उधळून देण्याचा इशारा दिला त्यामुळे संयोजकांनी नमतं घेऊन फोटो हटवला होता. पण आता ग्रामस्थांनी परशुरामाची प्रतिमा व्यासपीठावर आणून ठेवली आहे. संयोजकांनी ब्रिगेडची मागणी मान्य केल्यामुळे लोटे परशुरामचे ग्रामस्थ नाराज होते. अखेरीस त्यांनी संयोजकांवर दबाव आणून संमेलनस्थळी परशुरामाचं होर्डिंग आणि व्यासपीठावर परशुरामाची प्रतिमा ठेवण्यास भाग पाडलंय. शुक्रवार वीरशैव मंदिरात लोटे परशुराममधील संतप्त ग्रामस्थांनी आपल्या भावना संयोजकांनी दुखावल्याबद्दल त्यांना धारेवर धरलं. आणि संमेलनस्थळी मोर्चा घेऊन येण्याचा इशाराही दिला. त्यामुळे अखेर संयोजकांनी स्थानिक भावना लक्षात घेऊन परशुरामाची होर्डिंग आणि प्रतिमा संमेलनस्थळी लावली आहे. ग्रामस्थांच्या या नव्याभुमिकेमुळे संमेलनावर पुन्हा एकदा वादाचे ढग गडगडायला लागलेय.

close