सदस्यांच्या नेमणुकांवरून वाद

January 2, 2013 4:57 PM0 commentsViews: 26

02 जानेवारी

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापलेल्या एसआयटीवरून बराच वाद सुरू झालाय. या एसआयटीचं अध्यक्षपद ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांना देण्यावरूनच वाद होता. पण एसआयटीच्या इतर तीन सदस्यांवरही आता आक्षेप घेतले जाताहेत. त्यांची नियुक्ती ही फिक्सिंग असल्याचा आरोप होतोय.यातले निवृत्त पाटबंधारे सचिव व्ही.एम.रानडे हे तर कंत्राटदारांचेच सल्लागार होते.

आधी सिंचन घोटाळ्यावरून वाद.. मग श्वेतपत्रिकेवरून वाद.. त्यानंतर एसआयटीच्या मागणीवरून वाद.. आणि आता एसआयटीमध्ये असलेल्या सदस्यांवरूनच वाद सुरू झालाय. एसआयटीचे अध्यक्ष असलेल्या माधव चितळेंच्या नावालाच मेधा पाटकरांनी आधी विरोध केला. आता या समितीत असलेल्या व्ही. एम. रानडे यांच्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. रानडे हे स्वत:च तारळी धरण बांधणार्‍या कंत्राटदारांचे सल्लागार असल्याचं उघड झालंय. आयबीएन लोकमतच्या हाती याबद्दलची सर्व कागदपत्रं लागली.

एसआयटीची निष्पक्षता वादात- सातारा: तारळी धरणाचं कंत्राट 3 कंपन्याना देण्यात आलं- मिस्टर अँड मिसेस प्रसाद सेव कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड- प्रभाकर कंपनी लिमिटेड- मिसेस गॅमन प्रोग्रेसिव्ह लिमिटेड- व्ही. एम. रानडे तिन्ही कंपन्यांचे तांत्रिक सल्लागार

आयबीएन लोकमतच्या आजचा सवाल या कार्यक्रमात मेधा पाटकर यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एसआयटीमधले इतर सदस्य आहेत निवृत्त अर्थसचिव ए. के. डी जाधव आणि निवृत्त कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर… यापैकी जाधव यांना निवृत्तीच्या दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्र वॉटर रिसोर्स रेग्युलेशन अथॉरिटीवर नियुक्ती मिळाल्याचा आरोप आहे. तर लव्हेकर हे काही सिंचन तज्ज्ञ नाहीत.

त्यामुळे सिंचन घोटाळ्याची पारदर्शक व्हावी, याबाबत सरकार किती प्रामाणिक आहे, असा प्रश्न निर्माण झालाय.

एसआयटीचे सदस्य- निवृत्त अर्थसचिव ए. के. डी जाधव – निवृत्त कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर- जाधव यांची महाराष्ट्र वॉटर रिसोर्स रेग्युलेशन अथॉरिटीवर नियुक्ती – लव्हेकर सिंचन तज्ज्ञ नाही

एसआयटीचे दुसरे सदस्य आहेत निवृत्त वित्त सचिव ए. के. डी जाधव त्यांच्याबद्दलची माहिती आणि आक्षेप – 1970 च्या बॅचचे आयएएस अधिकारी – राज्याच्या वित्त आणि नियोजन खात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त – निवृत्तीनंतर मार्च 2010 पासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष आक्षेप- नियुक्ती उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या मर्जीतून झाली होती, असं मानलं जातं.

कोण आहेत लव्हेकर ?- निवृत्त कृषी आयुक्त- राज्य सेवेतून आयएएस बनले- नेहमीच सत्ताधार्‍यांच्या मर्जीत राहिले- विलासराव देशमुख, शरद पवार यांचे आवडते अधिकारी- पणन संचालक, लातूरचे जिल्हाधिकारी, कृषी आयुक्तआक्षेप- पाटबंधारे विभागाच्या कामाचा अनुभव नाही

माधवराव चितळेंच्या नावालाही होता विरोधकेवळ सदस्यच नाहीत, तर या सिंचन एसआयटीचे अध्यक्ष माधवराव चितळे यांच्या नावालाही यापूर्वी मेधा पाटकरांनी आक्षेप घेतला होता. त्यांची आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळेच डॉ. चितळे यांनी माधवराव चितळेचं अध्यक्षपद स्वीकारलं असं बोललं जातंय. खरंतर शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त करुन 12-12-12च्या मुहूर्तावर राष्ट्रवादी मासिकाचा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आलं. मासिकाच्या संपादकांनी घेतलेली माधराव चितळेंची मुलाखत या पाणलोट क्षेत्र विकास विशेषकांचं प्रमुख आकर्षण होतं. या मुलाखतीत चितळेंनी सिंचनाच्या उपाययोजनांचा उहापोह केलाय. त्यांच्या लेखातूनच सिंचनाची भावी दिशा सहज स्पष्ट होते. तेच चितळे आता माधवराव चितळेच्या माध्यमातून कारवाई आणि उपाययोजना सूचवणार आहेत. या मुलाखतीनंतर 10 दिवसांत त्यांची एसआयटीवर वर्णी लागली. दरम्यान, ही SIT कशी आहे याबाबत खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच पत्रकारांना माहिती दिली, ते म्हणाले, 'सिंचनावरची SIT ही न्यायालयीन चौकशी नाही. आत्तापर्यंत कुठल्या चुका झाल्या आणि भविष्यात त्या कशा सुधारता येतील, यासाठी ही SIT आहे.'

close