आजपासून लोकल प्रवास 3 रूपयांनी महागला

January 1, 2013 10:49 AM0 commentsViews: 3

01 जानेवारी

नवीन वर्षाचं स्वागत होत असताना मुंबईकरांच्या खिशाला आजपासून चाट बसणार आहे.आजपासून लोकलचा प्रवास महागलाय. लोकलच्या दुसर्‍या सेकंड क्लासच्या तिकीटात तीन रुपयांनी तर फर्स्ट क्लासचं तिकीट सहा रुपयांनी महागलं आहे. याशिवाय उपनगरी गाड्यांच्या मासिक पासमध्येही वाढ करण्यात आलीय. मासिक पासमध्ये दुसर्‍या वर्गाच्या भाड्यात 11 ते 50 किमीसाठी 30 रुपये, 51 ते 100 किमीसाठी 100 रुपये तर फर्स्ट क्लासच्या मासिक पासमध्ये 60 आणि 90 रुपये अशी वाढ करण्यात आलीय. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा अधिभार उपनगरी तिकीट आणि पासावर आजपासून लागू होईल.

लोकल प्रवास महागला

सेकंड क्लास किमान तिकिट – 3 रु. वाढफर्स्ट क्लास तिकिट – 6 रु. वाढ उपनगरी गाड्यांच्या मासिक पासमध्येही वाढ सेकंड क्लास 11 ते 50 किमी – 30 रु. वाढसेकंड क्लास 51 ते 100 किमी – 100 रु. वाढफर्स्ट क्लास मासिक पास – 90 रु. वाढसेकंड क्लास मासिक पास – 60 रु. वाढ

close