राजस्थानात 60 टक्के मतदान

December 4, 2008 5:04 PM0 commentsViews: 5

4 डिसेंबर, दिल्ली राजस्थान विधानसभा निवडणुकीत आज 60 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मुख्यमंत्री वसंुधरा राजे आणि काँग्रेसचे अशोक गहलोत यांनी सकाळी मतदान केलं. राज्यपाल एस.के.सिंग आणि त्यांच्या पत्नी मंजू सिंगही मतदान करण्यासाठी आले पण आयत्यावेळी मतदान यंत्र बंद पडलं. दिवसभरात बर्‍याच वेळी मतदान यंत्र बंद पडलं तर गुज्जर- मिना बहुल भागात काही हिंसक घटनाही घडल्या तर काही ठिकाणी मतदान यंत्र पळवण्याचा प्रयत्न झाला.

close