अवैध गर्भपात प्रकरणी न्यायाधीश एस.टी.महाजन निलंबित

January 10, 2013 4:56 PM0 commentsViews: 4

10 जानेवारी

बीडमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांना ज्या न्यायाधीशांनी जामीन दिला होता, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. न्यायाधीश एस.टी.महाजन असं त्यांचं नाव आहे. त्यांना निलंबित करण्यात आलंय. एस.टी महाजन हे अंबाजोगाई कोर्टाचे ऍडिशनल सेशन्स जज आणि डिस्ट्रीक्ट जज क्रमांक 1 आहेत. मुंबई हायकोर्टाच्या बेबसाईटवर त्यांच्यावरच्या कारवाईची माहिती देण्यात आलीये. निलंबनाच्या कारवाई दरम्यान, त्यांना विनापरवानगी मुख्यालय सोडायला मज्जाव करण्यात आलाय. तसंच कोणतीही खाजगी नोकरी करायला निर्बंध घालण्यात आलेत.

कोण आहेत निलंबित न्या. महाजन ?

- सुधाकर तुकाराम महाजन- अंबाजोगाई अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि जिल्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी- 2010 मध्ये पीसीपीएनडीटी खटल्यामध्ये डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांना जामीन देणारे न्यायाधीश- 2010 च्या पीसीपीएनडीटी खटल्यातून ज्यांनी सरस्वती मुंडे यांना आरोपी म्हणून 2012 साली वगळले, ते हे न्यायाधीश – विजयमाला पाटेकर मृत्यूप्रकरणी 2012 साली ज्यांनी डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांच्यासह 17 आरोपींना जामीन दिला ते न्यायाधीश – या जामिनानंतर डॉ. मुंडे दांपत्य 26 दिवस फरार होते

close