‘पाकनं युद्धबंदीचं पालन करावं’

January 14, 2013 9:33 AM0 commentsViews: 4

14 जानेवारी

युद्धविरामाचं उल्लंघन प्रकरणी पूँछमधल्या चाकन-दा-बागमध्ये ब्रिगेडियर स्तरावरची बैठक संपली. या बैठकीत भारतानं पूँछमध्ये पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबाराचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. पाकिस्ताननं युद्धबंदीचं पालन करावं अशी भूमिका भारताने घेतलीय. सीमारेषेवर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर बैठकीची भारतानं मागणी केली होती. या बैठकीत सीमारेषेवर झालेल्या गोळीबार चर्चा झाली. 7 जानेवारी रोजी पाकिस्तानाने युद्धविरामाचे उल्लंघन करत भारतीय सिमारेषेत घुसखोरी करून गोळीबार केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. पाक सैनिक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शहीद जवानाचं शिर कापून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती. भारताने आजच्या बैठकीत शहीद हेमराज यांचे शिर परत देण्यात यावे अशी मागणी केली. पण पाकिस्तानाने भारतीय जवानाचे शिर पळवून नेण्याच्या आरोपाला स्पष्ट नकार दिलाय.

close