तिचं बलिदान व्यर्थ जाणार नाही -पंतप्रधान

December 29, 2012 9:45 AM0 commentsViews: 4

29 डिसेंबर

दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणीची 13 दिवसांची झुंज अपयशी ठरली. मध्यरात्री सव्वा दोन वाजता तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूमुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दूख व्यक्त केलं. ट्विटरच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून दिला.

दिग्गजांची श्रद्धांजली

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी – दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार, देशवासियांनी शांतता राखावीपंतप्रधान मनमोहन सिंग – सर्व देशवासीयांच्या दु:खात मी सहभागी तिचं बलिदान व्यर्थ जाणार नाही अरविंद केजरीवाल – आपण सगळेच या घटनेला जबाबदार आहोत. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. जावेद अख्तर – कौटुंबिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या महिलांवरच्या, हिंसाचाराविरोधात उभं राहिलं पाहिजे. अमिताभ बच्चन – अमानत, दामिनी ही फक्त नावं. ती शरीरानं गेलीय. पण तिचा आत्मा आपल्यासोबत नेहमीच राहील.शोभा डे – 'मुझे जिने दो'. आजच्या स्त्रीची आर्त हाक. हीच निर्भयाला श्रद्धांजली.श्रेया घोषाल – एवढा पाशवी बलात्कार पहिल्यांदाच समोर आला..पण नवर्‍याकडून होणार्‍या बलात्काराचं काय?बिपाशा बासू – जे काही झालं, त्यानं मी अस्वस्थ आहे..

close