दिल्ली गँगरेप प्रकरणी उद्या आरोपपत्र दाखल होणार

January 2, 2013 5:11 PM0 commentsViews: 3

03 जानेवारी

दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी संबंधित बसच्या मालकाला पोलिसांनी आज अटक केली. दिल्ली पोलीस उद्या या प्रकरणी ई-चार्जशीट दाखल करणार आहेत. यातल्या सर्व आरोपींवर बलात्कार, खून, दरोडा आणि पुरावे नष्ट करणं, हे गुन्हे दाखल करणार असल्याचं समजतंय. या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र घ्यायचं नाही असा ठराव बार असोसिएशननं मंजूर केलाय. खटल्यासाठी सरन्यायाधीश अल्तमाश कबीर यांनी आज दिल्लीत फास्ट ट्रॅक कोर्टाचं उद्घाटन केलं. सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला उद्यापासून या कोर्टात सुरू होईल. दुसरीकडे दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलिसांना फटकारलंय.बलात्कार प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्याऐवजी 144 कलम लागू केल्याबद्दल कोर्टानं पोलिसांची कानउघाडणी केलीय.

close