पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची आत्महत्या

January 4, 2013 12:27 PM0 commentsViews: 8

04 जानेवारी

पुण्यात येरवडा येथील आयबीएम कंपनीत काम करणार्‍या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. अर्चना दसार (वय 38) असं या महिलेचं नाव आहे. अर्चनाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना दसार ही सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये दाखल झाली. त्यानंतर अर्ध्यातासानंतर सातव्या मजल्यावर जाऊन तिने आत्महत्या केली. अर्चनाचा पती संदीप दसार हा सुद्धा हिंजवड येथील आयटी कंपनीत नोकरीला आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. याप्रकरणी आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहे.

close