वर्षा गायकवाड यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

January 10, 2013 5:03 PM0 commentsViews: 92

10 जानेवारी

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय. 2010 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिला आयोगाला लवकरात लवकर अध्यक्ष मिळवून देण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिलं होतं. मात्र, हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यामुळे सभागृहाचा अवमान झालाय, असा आरोप प्रस्तावामध्ये करण्यात आलाय. विधानपरिषद नियमावली 240 अंतर्गत विधानपरिषदेच्या सचिवांकडे आणि विधानपरिषदेच्या सभापतींकडे हा प्रस्ताव 9 नऊ जानेवारीला सादर करण्यात आला आहे. चार डिसेंबर 2010 हिवाळी अधिवेशनात नागपूर इथं महिला व बालविकास मंत्र्यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या दरम्यान हे आश्वासन दिलं होतं, असंही नीलम गोर्‍हे यांनी प्रस्तावात म्हटलंय. 2009 पासून राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये.

close