मुंबईच्या मदतीसाठी धोणी सरसावला

December 4, 2008 5:10 PM0 commentsViews: 85

4 डिसेंबर, मुंबई विनायक गायकवाडएक भरवशाचा खेळाडू आणि उत्तम कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोणीची ओळख आहे पण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता धोणीच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू जगाला पाहायला मिळालाय.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवळपास दोनशे निरपराध लोकांना जीव गमवावा लागला तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटले आणि भारतीय क्रिकेट टीमही याला अपवाद नव्हती. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबांना मदत म्हणून भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी आता पुढे सरसावला. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही टेस्टमधील मिळणारं मानधन त्यांना देण्याचा निर्णय धोणीनं घेतलाय. त्याचबरोबर टीम इंडियाच्या त्याच्या सहकार्‍यांनीही या कार्यात त्याला मदत करावी, अशी इच्छा धोणीनं व्यक्त केली. धोणी इतक्यावरच थांबलेला नाही तर या टेस्ट सिरिजमध्ये विकेट घेतल्यानंतर, रनआऊट किंवा चांगली फटकेबाजी केल्यानंतर ' सेलिब्रेशन ' करायचं नाही, असं धोणीनं आपल्या टीमला सुचवलयं. निवृत्त होणार्‍या कुंबळेला ऑस्ट्रेलिया सिरिजचा कप स्वीकारण्याचा मान देणारा धोणी त्याचबरोबर करिअरची शेवटची मॅच खेळणार्‍या गांगुलीला जाता जाता कप्तानपदाची धुरा सांभाळण्याचा मान देणारा धोणी आणि आपली समाजाप्रती नैतिकता आणि देशबांधवांबद्दलच्या भावना अशा आगळ्या प्रकारे व्यक्त करणारा धोणी एक उत्तम भारतीय असल्याचाही संदेश देतोय.

close