‘बिल्डरशाही’ विरोधात मेधा पाटकरांचा मोर्चा

January 2, 2013 5:26 PM0 commentsViews: 4

03 जानेवारी

मुंबईत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टीवासियांनी मोर्चा काढला. बिल्डरांकडून होत असलेल्या फसवणुकीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातल्या डॉ. आंबेडकर उद्यानातून निघालेला हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. राजीव गांधी आवास योजना शहरातल्या सगळ्या वस्त्यांसाठी लागू करावी अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. मेधाताईंच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेण्यासाठी गेलंय. सध्या त्यांच्यात चर्चा सुरू आहे.

close