चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

January 4, 2013 12:43 PM0 commentsViews: 3

04 जानेवारी

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरूणीवर बलात्काराच्या घटनेनं देशभरात महिला संरक्षणाबाबत आवाज उठवला जात आहे. पण दुसरीकडे बलात्कार,विनयभंग, छेडछाडीची प्रकरण समोर येतच आहे. मुंब्र्यात चालत्या रिक्षामध्ये एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. पण या मुलीनं धाडस दाखवत रिक्षातून उडी घेऊन, आपली सुटका करुन घेतली. सकाळच्यावेळी या मुलीने मुंब्रा इथून शेअर रिक्षा पकडला. त्यावेळी रिक्षामध्ये आधीचं दोघे जण होते. मुलगी रिक्षामध्ये बसताच त्यांनी तिच्याशी गैरवर्तन सुरू केलं. मुलीनं धाडस दाखवत रिक्षातून उडी घेतली. त्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठून मुलीने तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी 3 अज्ञात तरुणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.

close