शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी चौटालांना पुत्रासह अटक

January 16, 2013 9:55 AM0 commentsViews: 15

16 जानेवारी

शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय चौटाला या दोघांना अटक करण्यात आली आहे. शिक्षकभरती घोटाळ्या प्रकरणी दिल्ली कोर्टानं या दोघांना दोषी ठरवलंय. या दोघांना 22 जानेवारीला कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. चौटाला पिता-पुत्रासह आणखी 55 जणांना ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी रोहिणी कोर्टाच्या विशेष सीबीआय कोर्टाने चौटाला पित्रा-पुत्रासह 55 जणांना दोषी ठरवलंय. यामध्ये आयईएएस अधिकार्‍याचाही समावेश आहे. सप्टेंबर 1999 रोजी चौटाला सरकारने जेबीटी शिक्षकांच्या 3 हजार 206 पदांसाठी 18 जिल्ह्यात एक समिती नेमून भरती केली होती. पण या भरतीमध्ये 8 हजार उमेदवारांच्या भरतीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर चुकीचे कागदपत्र, दगाबाजी, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी आता 22 जानेवारीला अंतिम सुनावणी होणार आहे.

close