‘काकस्पर्श’ला संत तुकाराम सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार

January 17, 2013 5:00 PM0 commentsViews: 42

17 जानेवारी

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा आज समारोप झाला. यंदाच्या वर्षी 'तुकाराम' सिनेमासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार राजन कोठारी यांना देण्यात आला. तर सुमित्रा भावे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार संहिता या सिनेमासाठी देण्यात आलाय. तर 'तुकाराम' सिनेमातल्या अभिनयासाठी जितेंद्र जोशी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसंच अभिनेता सचिन खेडेकर यांना काकस्पर्श सिनेमातल्या भूमिकेसाठी स्पेशल जुरी ऍवॉर्ड देण्यात आला आहे. यंदाच्यावर्षी काकस्पर्श चित्रपटाने संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला आहे.