मोर्चा हाऊसफुल्ल,एसटीची हवा गूल

January 11, 2013 9:58 AM0 commentsViews: 14

11 जानेवारी

मनसेच्या एसटी कामगार वाहतूक सेनेचा मोर्चा मुंबई सेंट्रलवरून आझाद मैदानावर पोहचलाय. विविध मागण्यांसाठी राज्यातील हजारो एसटी कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. एकाचवेळी हजारो कर्मचार्‍यांना सामूहिक रजा टाकल्यानं गुरूवारपासून राज्यात अनेक ठिकाणी एसटी सेवा कोलमडली आहे. ठाणे,नाशिक,पुणे, औरंगाबाद,विदर्भातून मोठ्या संख्येवर एसटी कामगार आजच्या मोर्च्यात सहभागी झाले आहे. एकाचवेळी एवढ्यामोठ्या संख्याने रजेवर गेल्यामुळे एसटीचे चाक रूतलेच पण प्रवाशांनाही मोठा फटका बसलाय. ठाण्यात एसटी स्थानकावर शुकशुकाट

ठाणे जिल्ह्यातूनही हजारो एसटी कामगार मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे ठाणे आगारातून राज्यातल्या वेगवेगळ्या भागात जाणार्‍या काही एसटी बसेस चालक-वाहकांअभावी रद्द कराव्या लागल्यात. या मोर्चाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय. नेहमी वर्दळीचं ठिकाण असलेल्या ठाण्यातील वंदना एसटी स्थानकात आज शुकशुकाट होता.

कोल्हापुरात 50 टक्के वाहतूक विस्कळीत

कोल्हापुरातले 800 हून अधिक एसटी कर्मचारी मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेत, त्यामुळे जिल्ह्यातली 50 टक्के एसटी वाहतूक विस्कळीत झालीय. पुणे मुंबईसह लांब पल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या विस्कळीत वाहतुकीचा फायदा कर्नाटक राज्याच्या परिवहन महामंडळाला झालाय. कर्नाटकनं 2 दिवसांसाठी कोल्हापूर विभागातल्या फेर्‍यामंध्ये वाढ केलीय. कोल्हापूर विभागातले 400 चालक आणि 350 हून अधिक वाहकांनी रजा टाकल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. तसंच प्रवाशांचेही हाल होत आहे. तर उस्मानाबाद मध्ये एसटी कामगारांनी सामूहिक रजा टाकल्यानं आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 310 बस फेर्‍या रद्द होणार असल्याची माहिती उस्मानाबाद एसटी विभागानं दिली आहे.

एसटी कामगारांच्या काय मागण्या आहेत ?

- कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द व्हावी- 40 टक्के ग्रेड पे मिळावा- टोल टॅक्स रद्द करावा- डिझेलवरील विक्रीकरात सवलत मिळावी- 17.5 टक्के प्रवासी कर रद्द करा- विविध सवलतींची थकबाकी 160 कोटी रुपये सरकारनं एसटीला द्यावी- कामगार कायद्याप्रमाणे महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांना सर्व अधिकार मिळावेत

close