शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत राडा

January 14, 2013 10:04 AM0 commentsViews: 6

14 जानेवारी

नाशिक आणि कोकणानंतर आता कोल्हापूरमध्येही शिवसेनेतल्या दुहीचा प्रत्य आला. शिवसेना संपर्कप्रमुख दिवाकर रावते आणि अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जिल्हा शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राडा झाला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांसह कार्यकारिणीच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी करत प्रवेश केला. यावेळी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रावतेंच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. संघटनात्मक पदाधिकारी विरूद्ध लोकप्रतिनिधी असा वाद यावेळी रंगला. आमदार राजेश क्षीरसागर यांनाच पक्षाकडून झुकतं माप मिळत असून आपल्याकडे पक्षाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी संजय पवार यांनी केलाय. दरम्यान, याबाबतीत रावते यांनी पवार यांची नाराजी दूर केली जाईल अशी प्रतिक्रिया दिलीय. मात्र या घटनेमुळं शिवसेनेतला सत्ता संघर्ष तीव्र झाल्याचं स्पष्ट झालंय.

close