नाट्यदिग्दर्शक जयदेव हटंगड्डी कालवश

December 5, 2008 5:27 AM0 commentsViews: 4

5 डिसेंबर, मुंबई सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक जयदेव हटंगड्डी यांचं मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. 'पोस्टर ', ' मीडिया ', ' चांगुणा ', ' अबू हसन ' , ' आधी रात के बात ' ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. जयदेव हट्टंगडींनी त्यांचं नाट्यशिक्षण NSD तून पूर्ण केलं आहे. त्यानंतर ते मुंबईतल्या आविष्कार या संस्थेत सामील झाले आहेत. जयदेवजी आविष्कार या नाट्यसंस्थेचं एक अंगच होते. ' चांगुणा ' हे आविष्कारमधून बसवलेलं पहिलं नाटक. त्यांनी अनेक नाटकांची शिबिरं घेतली आहेत. राज्यनाट्य स्पर्धांची अनेक नाटकं बसवली. हौशी रंगभूमीवर त्यांनी बरचं काम केलं आहे.

close