सुरगाणा बलात्कार प्रकरणी 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे

January 1, 2013 12:56 PM0 commentsViews: 7

31 डिसेंबर

नाशिक येथील सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी पळसण आश्रमशाळेच्या 16 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं होतं पण यातील 15 कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्यात आलंय. अधिक्षक आणि मुख्याध्यापकांवरील कारवाई कायम आहे. पण मुळात रेक्टरसारखी पदं रिक्त असताना या रोजंदारीवरच्या कर्मचार्‍यांवर अचानक का बडगा उगारला जातोय ? असा सवाल उपस्थित केलाय. गेल्या रविवारी या आश्रमशाळेत 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची खळबळजणक घटना घडली. याप्रकरणी सहाही आरोपींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दररोज विशेष पथकाकडून आश्रमशाळेची तपासणी केली जाणार आहे.

close