हिंदुस्थान मिलच्या जागेला 7.6 एफएसआयचा निर्णय रद्द

January 7, 2013 1:02 PM0 commentsViews: 11

07 जानेवारी

प्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिराला लागून असलेल्या हिंदुस्थान मिलच्या जागेला 7.6 इतका एफएसआय देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. 2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला होता. तो व्यवहार्य नाही असं नोंदवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय गेल्या महिन्यात रद्द केला. यामुळं आकृती बिल्डरनं विकत घेतलेल्या 6 एकर जागेच्या बांधकामाला फटका बसलाय. 2007 मध्ये आकृती बिल्डरच्या हब टाऊन कंपनीने डीएलफच्या मदतीने 350 कोटीला ही हिंदुस्थान मिलची जागा विकत घेतली होती. त्यावर 7.6 एफएसआय वापरून 60 मजली पंचतारांकित हॉटेल बांधायची योजना होती. पण आता विकासकाला 1.33 इतकाच एफएसआय वापरता येणार आहे.

close