दिल्ली गँगरेप प्रकरणाचा खटला अखेर फास्ट ट्रॅक कोर्टात

January 17, 2013 5:11 PM0 commentsViews: 10

17 जानेवारी

संपूर्ण देशाला हादरा देणार्‍या दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला आता यापुढे फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. 21 जानेवारी रोजी फास्ट ट्रॅक कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू होईल. दरम्यान, या खटल्यातला मुख्य आरोपी रामसिंग याच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि हा खटला दिल्लीबाहेर हलवण्याची मागणी केलीय. दिल्लीतल्या कोर्टात आपल्याला न्याय मिळणार नाही असा दावा रामसिंग यानं केलाय. दरम्यान, दिल्लीतल्या कोर्टानं खटल्यातल्या 5 आरोपींची न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 16 डिसेंबर 12 रोजी पीडित तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घडना घडली होती. या प्रकरणी पाच नराधामांना अटक करण्यात आलीय. मात्र पीडित तरूणीची 13 दिवसाची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. तिचा सिंगापूरच्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तिच्यावर झालेला अत्याचार आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सत्तेच्या दारावर तरूणाई धडक मारली होतीय आज या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. आणि अखेर या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रक कोर्टात होणार आहे.

close