अखेर हर्षवर्धन जाधव ‘इंजिना’तून उतरले

January 9, 2013 11:04 AM0 commentsViews: 2

09 जानेवारी

अखेर मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 'इंजिन'मधून आपली 'गाडी' मोकळी करून घेतली आहे. मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. जाधव यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. मनसेमध्ये आपली घुसमट होत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिलाय. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाधव यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. राजीनामा दिल्यानंतर जाधव यांनी जखमावरच्या खपल्या काढायला सुरूवात केली. विधानसभेच्या तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलाय. जाधव यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची धमकी दिली होती अखेर आज त्यांनी आपला इशारा खरा करून दाखवला आहे. मनसेकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही

close