धुळे दंगलीची होणार सीआयडीमार्फत चौकशी

January 11, 2013 10:10 AM0 commentsViews: 28

11 जानेवारी

धुळे दंगल प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार आहे. धुळ्याचे एसपी प्रदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी एकाला अटक केली आहेत. यशराज मराठा खाणावळ या हॉटेलमध्ये झालेल्या वादामुळे ही दंगल सुरू झाली होती. या हॉटेलचे मालक किशोर वाघ यांना पोलिसांनी अटक केलीय. 13 जानेवारी पर्यंत वाघ यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे आज धुळे आणि नाशिकमध्ये जाणार होते, पण गृहमंत्रालयानं त्यांना तिकडे जाण्यास बंदी घातली आहे.

close