पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख संशयित अटक

January 14, 2013 10:13 AM0 commentsViews: 28

14 जानेवारी

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख संशयिताला अटक करण्यात आली आहे. बंटी जहागिरदार असं या संशयित आरोपीचं नाव आहे. बंटीला महाराष्ट्र एटीएस (ATS) नं आज अहमदनगरमधून अटक केली. तर आज त्याला मोक्का कोर्टात हजर केलं जाणार आहे. एका वर्षापुर्वी पुण्यातील जंगली महाराज रोड, बाल गंधर्व नाट्यमंदीर, देना बँक ब्राँच, मॅकडोनाल्ड आणि गरवारे पुलाजवळ साखळी बॉम्बब्लास्ट झाले होते. याप्रकरणी ही अटक अत्यंत महत्वाची मानली जातेय. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या बंटीची आई राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेविका असल्याचं समजतंय.

close