दिल्ली विमानतळावर गोळीबार

December 5, 2008 5:58 AM0 commentsViews: 1

5 डिसेंबर, दिल्लीगुप्तचर संस्थांनी एकीकडं हवाई हल्ल्यांचा इशारा दिलेला असतानाच दिल्ली एअरपोर्टवर रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडल्याचं समजतंय. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या अरायव्हल टर्मिनलमध्ये घुसण्याचा एका पांढर्‍या क्वालिस कारनं प्रयत्न केला. क्वालिसमधल्या व्यक्तीनं गेट नंबर चारजवळ बंदुकीच्या काही फैरी झाडल्या आणि त्यानंतर पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर एअरपोर्टचे सर्व गेट्स ताबडतोब बंद करण्यात आले. सीआयएसएफ आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

close